पिंपरी :- इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या ७५ सायकलपटूंची पुणे टू हम्पी ६०० किमी हेरिटेज राईडचा प्रारंभ आज झाला आहे. आज पहाटे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रकाश शेटबाळे उद्योजक अण्णा बिरादार, धनंजय शेडबळे, अनिल मित्तल, एफ डी सी लिमिटेडचे संदीप कुलकर्णी (इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सुहास माटे, पोलीस अधिकारी अजय दरेकर, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ व अमृता पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय काम करणारी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी या संस्थेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या ७५ सायकलस्वारांनी मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असे सोळाशे किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले होते आणि यावर्षी पुणे ते हम्पी असे सहाशे किलोमीटरचे अंतर पार करून ते अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करणार आहेत. यासाठी पुन्हा एकदा आयएएसचे ७५ सायकलस्वार पुणे ते हम्पीसाठी आज सायकलवर रवाना झाले आहेत. पुणे टू हम्पी हे अंतर तीन दिवसात पार करण्यात येणार आहे.
प्रवासाचा मार्ग पुढीलप्रमाणे..
पुणे ते मोहोळ – २४० किमी
मोहोळ ते विजापूर – १५० किमी
विजापूर ते हम्पी – २२० किमी
विजापूर येथील गोल घुमट व इब्राहिम रोजा या दोन ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. तीन दिवस हम्पीमध्ये मुक्काम असल्यामुळे विविध ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे. संपूर्ण हम्पी परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक वारसा बद्दल माहिती घेण्यात येणार आहे. राईडमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी सहभाग घेतला आहे. सर्व रायडर्स सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सायकलिंग करणार आहेत.
पुणे ते हम्पी राईडमध्ये इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे गिरीराज उमरीकर, अजित गोरे, रमेश माने, श्रीकांत चौधरी, सुशील मोरे, अमीत पवार, प्रतीक पवार, नितीन पवार, सुधाकर टिळेकर, अविनाश चौगुले, रवी पाटील, अमृता पाटील, पूनम रणदिवे, संदीप लोहकर, मंगेश दाभाडे, शिवाजीराव काळे, प्रशांत तायडे, दीपक नाईक, अभिनंदन कासार, स्वप्नील लोढा, दर्शन वाले, हनुमंत शिंदे, गणपत मसाळ, अभिजित सरवदे, रमेश सेनचा, रोनाक जैन, प्रवीण पवार, धनाजी गोसावी, अभय खटावकर, दत्तात्रय मेंदुगडे, राहुल जाधव, मंगेश भुजबळ, सुजित मेनन, माधवन स्वामी, वाल्मिक अहिरराव, देविदास खुर्द, अमित कडे, शीतलकुमार चौहान, अनिल पिंपळकर, डॉ. अजित कुलकर्णी, विवेक सिंग, चैतन्य वझरकर, अमित कुमार, सुबोध मेडीसीकर, प्रसाद सागरे, महेश वनीकर, हेमंत दांगट, पंजाबराव इंगळे, नरेश चड्ढा, अभिजित रोडे, तानाजी मांगडे, संतोष टोणपे, सचिन टोणपे, उमेश सुर्वे, श्रेयस पाटील, नितीन पवार, विवेक कडू, सुनिल चाको, प्रशांत जाधव, मदन शिंदे, अजित पुरोहित, ईश्वर जामगावकर, सागर शिरभाते, मोरेश्वर पिदडी, बालाजी जगताप, दीपक उमरणकर, दत्तात्रय आंधळकर, योगेश तावरे, योगेश कौशिक आदी सायकलस्वार सहभागी झाले आहेत.