महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे का पडतात?
मागे पडतात, याबाबत काही आकडेवारी उपलब्ध आहे का? असो.
मी तुम्हाला काही आकडे सांगते, त्यावरून तुम्ही ठरवा.
खालील आकडेवारी 2002–2012 या कालावधीतील आहे.
2017 चा निकाल : राज्यातील आठ विद्यार्थ्यांनी टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आणि महाराष्ट्राने यशस्वी उमेदवारांचा स्वतःचा विक्रम मोडला – गेल्या वर्षीच्या 90 यशस्वी उमेदवारांवरून वरून 100 वर आकडा गेला.
2018 चा निकाल : यंदा राज्यातील ८५ ते ९० उमेदवारांची या परीक्षेतून निवड झाली. तर पहिल्या पन्नास उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.
2019 चा निकाल : कुठून ही स्पष्ट आकडेवारी मिळाली नाही.
2020 चा निकाल : 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले.
2021 चा निकाल : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.
माझ्या निरीक्षणावरून तरी असे दिसते, परीक्षेत महाराष्ट्राला घवघवीत यश मिळतंय. एकूण जागाच्या 10 % महाराष्ट्राचे उमेदवार उत्तीर्ण होतं आहेत. हो आता महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, हा आकडा काहींना कमी वाटू शकतो. मला मात्र हे यश पुरेसे वाटते.
याबाबत अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महाराष्ट्रातील किती विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि किती यशस्वी होतात. या प्रकरणी बराच वेळा उत्तर प्रदेश आणि बिहार मधील विद्यार्थ्यांचा संदर्भ दिला जातो. या राज्यांतील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांनी ही परीक्षा पास होण्याकरिता आयुष्याची खर्च केलेली वर्ष पाहिली तर एक नैराश्यजनक परिस्थिती समोर येते.
अजून एक मुद्दा, या राज्यातील यशस्वी उमेदवार त्यांच्याच “home Cadre ” ला प्राधान्य देताना दिसून येत नाही. ज्या उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांनी देशाला सर्वाधिक IAS ऑफिसर दिलेत त्यांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. याबाबत मी फार काही लिहीत नाही. असे वाटायचे की महाराष्ट्रचं उत्तर देताना मी इतर राज्यांना कमी लेखतेय.
महाराष्ट्र यूपीएससी परीक्षेत मागे वगैरे आहे असे मला वाटतं नाही. महाराष्ट्राचे विध्यार्थी आळशी आहेत या मताशी ही मी सहमत नाही.
उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांबाबत मनात काही चुकीच्या भावना नाहीत. भारतीय सैन्यात तर उत्तर प्रदेशाचेच जास्त अधिकारी व सैनिक आहेत.
बाकी, आजकाल समाजमाध्यमातून या सनदी अधिकाऱ्यांची “सेलिब्रिटी ” म्हणून जी एक इमेज तयार होतेय ती मला अत्यंत धोकादायक वाटते. त्यांनी कामं कराव, प्रकाशझोतात येणं हा त्यांच्या कामाचा भाग नाही.
सौजन्य – Quora लेखन(निशा डोळस, लेखापरीक्षक)
https://qr.ae/pr1Ion