चौफेर न्यूज – आपलं मूल शाळेत जातं आणि चांगला अभ्यास करतं म्हणजे ते हुशार आहे असं आपण मानून चालतो. पण अभ्यास आला म्हणजेच आपण शिकलो असे नाही. तर आपल्याला व्यवहारात वागण्याचे, बोलण्याचेही ज्ञान असायला हवे.
शिक्षण घेतल्याने हे ज्ञान मिळेलच असे नाही. हाच विचार करुन शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचा वेगळा तास घेतला जातो. या तासाकडे आपल्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नसले तरी इतर देशांत मात्र मुलांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, आपतकालिन परिस्थितीत काय करावे, किमान औषधोपचार यांबाबतचे शिक्षणही या मुलांना दिले जाते.
जपानमधे मुलांना सार्वजनिक वाहतूकीबाबतचे मॅनर्स शिकवतात. नाट्य रुपात मुलांना अतिशय रोजच्या घटनांमधून महत्त्वाचे धडे दिले जातात