चौफेर न्यूज – महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्ये प्रवेश देताना जुन्या शाळेतील बदली प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. कोविड काळात कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या पाहता.
जुन्या शाळा सोडून इतर शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) देण्यास शाळा नकार देत असल्याचे आढळून आले आहे. केवळ टीसी न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होत आहे.
Birth Certificate वर मिळणार प्रवेश
राज्यभरातील प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सहज प्रवेश घेऊ शकतील.
विद्यार्थ्याचा जन्म दाखला पाहून त्याच्या वयानुसार त्याला वर्गात प्रवेश देण्यात यावा.