चौफेर न्यूज – श्रद्धेय पब्लिक स्कूल बालेवाडी, पुणे येथे वार्षिक क्रिडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षिका सौ.अलका हाके, पूनम तांदळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
सिनियर केजी, इयत्ता पहिली, दुसरी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गशिक्षिकांबरोबर झुंबा डान्स वर्कआऊट केला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या खेळांमध्ये सहभाग दर्शवला. यामध्ये बेडूक उडी, कांगारू उडी, लिंबू चमचा, थेली रेस, संगीत खुर्ची, चेंडू फेक, धावण्याची शर्यत आदींचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केया चॅटर्जी, पूनम तांदळे यांनी केले. क्रिडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रिडा शिक्षक उमेश इथापे, अलका हाके, पूनम तांदळे, मोहिनी हुकरे, रूपाली पाटील, धनश्री घाडगे, केया चॅटर्जी, अपूर्वा जगदाळे, अंजली कुमारी, दिव्या दिक्षित, अमर परकाळे आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.