दहा हजारहून अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड मतदारसंघातील विविध १३ ठिकाणी आयोजित या शिबीरांमध्ये १० हजाराहुन अधिक गोरगरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सर्व रुग्णांना फळ व बिस्कीटांचे वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस विलास मडिगेरी नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, उपाध्यक्ष राजू दुर्गे, रुग्णालयाचे अधिष्ठता राजेश वाबळे, वैद्यकीय अधीक्षक अभयचंद्र दादेवार, महेंद्र बाविस्कर, देवदत्त लांडे, सतिश नागरगोजे आदी पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
- प्रभाग क्र.१६ एमबी कॅम्प विकासनगर, प्रभाग क्र. १७ तुळजाभवानी मंदिर बिजलीनगर, प्रभाग १८ कै. शिवाजी भोईर सांस्कृतिक भवन, चिंचवडगाव, प्रभाग २२ पार्वती इंग्लिश मिडीअम स्कूल, ज्योतिबा नगर, काळेवाडी, प्रभाग २३ पडवळ नगर थेरगाव, प्रभाग २४ लक्ष्मीबाई बारणे विद्यालय गुजरनगर थेरगाव, प्रभाग क्र. २५ दत्त मंदिर माउली चौक वाकड, समीर भुजबळ चौक पुनावळे, अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुनावळे, कस्तुरी चौक वाकड, प्रभाग २६ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पिंपळे निलख, मनपा शाळा कस्पटे वस्ती वाकड, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र वेणू नगर, वाकड, प्रभाग २७ बळीराज कॉलनी नखाते वस्ती चौक रहाटणी, प्रभाग २८ पी.के.शाळेसमोर पिंपळे सौदागर, प्रभाग २९ महालक्ष्मी मंगल कार्यालय सुदर्शन नगर, सृष्टी चौक पिंपळे गुरव, प्रभाग ३१ शंकर पांडूरंग जगताप जनसंपर्क कार्यालय, कृष्णा चौक नवी सांगवी, प्रभाग ३२ शुभयोग मंगल कार्यालय ढोरे नगर, जुनी सांगवी या ठिकाणी आरोग्य शिबीरे घेण्यात आली.
- यामध्ये मोफत इसीजी तपासणी, मोफत डोळयांची दृष्टी तपासणी, दृष्टी तपासणीत मोतीबिंदू आढळल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सूट, हाडांची ठिसुळता चाचणी, सर्व प्रकारच्या चष्म्यांवर ३० टक्के सूट, ब्लड शुगर तपासणी, मणक्यांच्या आजाराची तपासणी आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या. शहर सरचिटणीस नामदेव ढाके, बाळासाहेब तरस, माजी नगरसेवक सुरेश भोईर, जवाहर ढोरे, हर्षद नढे, प्रमोद पवार, सनी बारणे, विशाल कलाटे, चेतन भुजबळ, नवनाथ ढवळे, भारती विनोदे, नितीन इंगवले, प्रसाद कस्पटे, अभिजित साळंखे, नरेश खुळे, संजय भिसे, अमर आदियाल, संजय मराठे यांनी या मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन केले.
आई- वडीलांचे छत्र हरपलेल्या अरमान शेखला उपचारासाठी मदत…
दरम्यान, वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अरमान शिरू शेख, रा. भोसरी या रुग्णाबाबत माजी नगरसेविका भीमाताई फुगे यांनी शहराध्यक्ष शंकर जगताप यांना वायसीएम रुग्णालय भेटीत माहिती दिली. या रुग्णाची लगेच प्रत्यक्ष भेट घेवून जगताप यांनी त्याची विचारपूस केली. आई – वडीलांचे छत्र हरपल्याचे भीमा फुगे व त्याच्या लहान बहिणीकडून समजले. जात धर्म याचा कधीच विचार करत न करता २० हजाराची रोख मदत उपचार व औषध खर्चासाठी शंकर जगताप यांनी शेख बहिण-भावाकडे सुपूर्त केली. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरांना आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचना शंकर जगताप यांनी डॉक्टर यांना दिल्या. भीमा फुगे या रोज वायसीएम रुग्णालयात भेट देवून अरमान शेख याची विचारपूस करीत असून, भाजपा अंत्योदयचा विचार करून आईची माया देत आहेत.
राज्याच्या विकासासाठी लोकनेते देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र झटत आहेत. हाती घेतलेले काम झपाट्याने पूर्ण करीत असताना त्यांची नाळ जनतेशी जुळली गेली आहे. राज्यातील रस्ते, वीजपुरवठा, उद्योग, सिंचन या बाबी राज्याचा विकासदर निश्चित करण्यासाठी कामी येत असल्या, तरी गरीब-सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच प्रगती मोजण्याचा मापदंड असतो. नागरिकांचे आरोग्य, विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता काम करण्याची दिशा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळते. या लोकनेत्याच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करून गोरगरीब रुग्णांची आरोग्य सेवा करण्यात आली.