प्रचिती इंटरनॅशनल स्कूलची “आषाढी वारी”; पारंपारिक पेहरावात म्हसदी गावात रंगला भव्य पालखी सोहळा
दिंडीला म्हसदी गावात म्हसदी साक्री मार्गावर व बस स्थानक या परिसरामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. दिंडी काढून “विठ्ठल हरी जय हरी विठ्ठल “राम कृष्ण हरी” “ज्ञानोबा माऊली तुकाराम “या नामो उच्चाराने विद्यार्थी भजन गात टाळ मृदंगाच्या संगे “विठ्ठल रुक्माईचा” जयघोष केला. ठिकठिकाणी विठ्ठलाचे भजन गीत गाऊन, रिंगण, फुगडीचे खेळ दाखवून मोठ्या आनंद उत्साहात वारीने आषाढी एकादशीची जनजागृती लोकांमध्ये करण्यात आली.
इ. ५ वी व इ.७ वी इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, टाळ नृत्य सादर केले. एक उत्कृष्ट असा आषाढी एकादशीचा संदेश विद्यार्थ्यांनी लोकांना दिला. महाराष्ट्रातील हि संतांची परंपरा आणि संतांची संस्कृती ही भारतातील एक आदर्श संस्कृती आहे. आपण त्या संस्कृतीचे पाईक आहोत. ती संस्कृती परंपरागत पद्धतीने टिकवून ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. संतानी आपल्याला ओवी, अभंग किर्तन, भारूडे यातून समाज प्रबोधन करतांना जनतेला एकात्मता व मानवतेचा उत्कृष्ट संदेश दिला, असे मनोगत जितेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सोनवणे यांनी केले. संयोजन प्रफुल साळुंखे, सपना देवरे, पुनम पवार, प्रभावती चौधरी तसेच लेझीम नृत्याचे उत्कृष्ट असे नियोजन श्रावण अहिरे, जागृती जाधव, गीतांजली काकुस्ते तसेच, टाळ नृत्याचे नियोजन हेमांगी गवांदे यांनी केले. कार्यक्रमाची सजावट साळुंखे सर व विठ्ठल रांगोळी रेखाटन किरण गवळी, श्रीमती दीपमाला अहिरराव, सविता लाडे यांनी केले. ‘पांडूरंग हरी जय जय पांडूरंग हरी ‘या पांडुरंगाच्या गजरात म्हसदी येथील गणू महाराज व सतिलाल महाराज या भजनी मंडळाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
म्हसदी येथील विठ्ठल व आई कुलस्वामिनी धनदाई मातेचे सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी दर्शन घेऊन सर्वानी स्नेहभोजनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात म्हसदी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व शाळेच्या प्राचार्य, शाळा समन्वयक, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायवर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.