चौफेर न्यूज – १५ डिसेंबर पर्यंत आकुर्डी येथे आर.टी.ई. प्रवेश मार्गदर्शन शिबीरासाठी नावनोंदणी सुरु प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. या शिबीरात मुख्याध्यापिका तथा RTE शासकीय समिती सदस्य सौ. रसिका परब मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी या शिबीराचे आयोजन केले आहे. बालकांचा शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये शैक्षणिक वर्ष २०२३ साठी आर.टी.ई. मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुले/ मुलींसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांसाठी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी नाव नोंदणी प्रकाश परदेशी काका, गणेश कामगार मंडळा शेजारी मेनरोड दत्तवाडी, आकुर्डी येथे दि.१५ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते सायं ७ वाजेपर्यंत करता येणार आहे.