पुणे : यंदाची 31 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ही 4 डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र नोटाबंदीमुळे या स्पर्धेलाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकल्याण्यात आली असून आता ही स्पर्धा जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते. 500 आणि 1000 रुपयांच्या बंदीमुळे जगभरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसेच अनेक व्यवहार ही या नोटाबंदीमुळे ठप्प झाले आहे. त्याप्रमाणेच पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवरही त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहेत. रन फॉर पुणे या संकल्पनेवर यंदाची ही स्पर्धा राबविण्यात येणार असून 42 किलोमीटरची ही स्पर्धा असणार आहे. रिओ ऑलिम्पिकमधील ललिता बाबर, सुधा सिंग,कविता राऊत, आदिल सुमारिवाला, रचिता मिस्त्री हे खेळाडू या स्पर्धे दरम्यान उपस्थिती लावणार आहेत.