पिंपरी : औद्योगिक शिक्षण मंडळ संचालित सीएसआयटी जुनियर कॉलेज, पूर्णानगर येथे “राष्ट्रीय गणित” दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अपर्णा मोरे, प्रमुख पाहुणे डॉ. जयश्री सुरवसे ( Director- S.P.G international school and junior college, Bhosari) यांच्याहस्ते सरस्वती आणि गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली.
डॉ.जयश्री सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स इन मॅथेमॅटिक्स आणि इम्पॉर्टन्स ऑफ मॅथेमॅटिक्स इन डिफेन्स बद्दल माहिती दिली. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध गणितीय खेळणी, गणितीय रांगोळ्या काढल्या. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. आम्रपाली लांडगे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी पवित्रा ठाकूर हिने केले. गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची माहिती व गणित विषयाचे महत्त्व प्रा. युगंधरा चौधरी यांनी सांगितले. आभार प्रा. सरिता शिंदे यांनी मानले.