पिंपरी :- भारतीय क्रिकेट नियमक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात कु.परिनिता युवराज पाटील हिची निवड झालेली आहे. सलामी आक्रमक फलंदाज व विकेटकिपर म्हणून संघात स्थान पटकाविलेले आहे. सोमवार (दि.२६) पासून झारखंड येथील रांची व जयपूर येथे खेळविल्या जाणाऱ्या BCCI लीग मध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आठवीत शिकणाऱ्या परिनिताने वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. सध्या ती पिंपरी चिंचवड येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणीत ती उत्कृष्ट कामगिरी करीत पात्र ठरलेली आहे. तत्पूर्वी अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवलेली आहे. पंधरा वर्षाखालील मुलींच्या संघाच्या निवडीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पुणे येथे निमंत्रित खेळाडूंचे सामने नुकतेच खेळविण्यात आले, त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत परिनिताने आपले स्थान पक्के केले आहे.