चौफेर न्यूज – चिखली – मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये यात्रा – 04 या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतीद्वारे सादरीकरण केले.
शिक्षणाधिकारी सौ. संध्या गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून यात्रा 04 ची सुरुवात झाली. सौ.गायकवाड यांना शाळा व्यवस्थापनाच्या वतीने संचालिका कमला बिष्ट आणि डॉ.संजय सिंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शिक्षणाधिकारी सौ.गायकवाड यांनी इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या यात्रेत विविध प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन झाल्याचे आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
शाळेमध्ये गेली चार वर्षे उत्कृष्टपणे सुरू असलेल्या अभ्यासक्रमास, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमास, विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्न विकासास इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या व्यवस्थापनाचे सहकार्य, शिक्षकांचे योगदान आणि पालकांचा सहभाग लाभला त्याबद्दल सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
संचालिका कमला बिष्ट यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे पालकांना उद्देशून सांगितले. बिष्ट मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल आणि शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.
श्री सरस्वती वंदनेने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने झाली. विद्यार्थ्यांनी शिवस्तोत्र, गणेशवंदना, बचपन, मां, हैप्पी, बर्फी, होली आदी गाण्यावर, संगीतावर अप्रतिम नृत्य केले. विशेष करून ओरिसाचे संभलपुरी नृत्य, मिझोरामचे बांबू नृत्य, कन्नडचे आदिवासी नृत्य, महाराष्ट्राचे गोंधळ नृत्य यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पानी बिना सब सुना या नुक्कड नाट्याने पाण्याचे महत्व पटवून दिले. तबला, हार्मोनियम, पियानो, ताल ही वाद्ये वाजवून कला कौशल्य सादर केले. वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
विविध सामाजिक, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विषयावर सादर केलेले नाट्यप्रयोग, नृत्यगीते डोळ्याचे पारणे फेडवणारी होती. प्रत्येक भाग सुरू होण्यापूर्वी छोट्या विद्यार्थ्यांनी केलेले सूत्रसंचलन हे नेतृत्व गुण करण्याची एक नवी शिकवण देऊन गेली.
मान्यवरांनी स्नेहसंमेलनात कला, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि सामूहिक नृत्य प्रकारात सहभाग घेतलेल्या आई बाबांचा सत्कार केला.
नृत्य, पथनाट्य, नाटके सुरू असताना पडद्यावर लावण्यात आलेले स्क्रीन, वेळोवेळी बदलत असणारे ग्राफिक्सने एखाद्या चित्रपटातील दृष्याचा अनुभव दिला. फेसबुक लाईव्हचे देखील नियोजन करण्यात आले होते. याद्वारे प्रेक्षकांनी घरबसल्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी कलाविष्कारवेळी परिधान केलेल्या वेशभूषा नेत्र सुखावून गेल्या.
पालकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मुळे विद्यार्थ्यांचे गुण कौशल्य, शैक्षणिक प्रगती अप्रतिम झाल्याचे पालकांनी आमच्या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.संध्या गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे उपआयुक्त श्री.संदीप खोत, गट शिक्षण अधिकारी श्री.अशोक गोडसे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि उपजिल्हाधिकारी श्री.बाळासाहेब खांडेकर आणि श्री.प्रशांत जोशी, क प्रभाग अधिकारी श्री.अण्णा बोदाडे, पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश जैन, सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय झोपे, विकास साने सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.विकास साने आणि सौ.सपना साने, नवसाह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थेचे अध्यक्ष श्री.निवृत्ती पिंगळे, ॲडव्होकेट सौ. शोभा कदम, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी श्री.प्रमोद पाटील, जर्मनीच्या इसूझू कंपनीचे श्री. ब्रिजेश सिंग, शाळेचे संचालक प्राध्यापक डॉ.अजित थिटे, प्रचिती स्कूलचे अध्यक्ष श्री.प्रशांत पाटील, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.विजय शिर्के तसेच विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा, आई-बाबा, बहीण-भाऊ आदी उपस्थित होते.
आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक श्री. आनंद सिंग यांनी यात्रा 04 चे निवेदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षिक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले.