मुंबई – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागातील, महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनच्या राज्य विकास संस्थेतर्फे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी मंडळे/ संस्थांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण माहितीचा शासन निर्णय राज्य मराठी विकास संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध् करण्यात आलेले आहे.