धुळे : येथील जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर मैत्रेय समूहाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका वर्षा मधुसुदन सत्पाळकर यांना धुळे ग्राहक न्यायालयाने हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे.
मैत्रेय समूहातील घोटाळ्यांबाबत नाशिक येथे पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये मुख्य व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा जामिन मंजूर करताना नाशिक न्यायालयाने विशेष बँक खात्यात सुमारे सहा कोटी रुपये जमा करुन त्याद्वारे ठेवीदारांना पैसे अदा करावेत, असे आदेश सत्पाळकर यांना दिले होते. त्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.
या घटनेनंतर काही ठेवीदारांनी धुळे न्यायालयातही सत्पाळकर यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले होते. त्या गुन्ह्यांच्या कार्यवाहीतही न्यायालयाने वरीलप्रमाणे प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ती प्रक्रिया राबविण्यात न आल्याने सत्पाळकर यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.