धुळे : पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार यापुढील काळात कॅशलेस व्यवहारासाठी जिल्हा बँक चालू महिन्यात एटीएम सेवा कार्यान्वित करीत आहे. त्यानुसार बँक ठेवीदारांना रूपे डेबीट कार्ड व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड प्रदान करण्याचे कामकाज प्रथम प्राधान्याने हाती घेवून डिसेंबरपूर्वी वाटपाचे नियोजन आहे, अशी माहिती धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 59 शाखा व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम भागातील 31 शाखा अशा सर्व 90 शाखा संगणकीकृत झाल्या असून सर्व शाखा मुख्य कार्यालय, गरुड बागच्या डाटा सेंटरशी जोडण्यात आल्या आहेत.
ज्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा नाहीत अशा 16 गावांमध्ये जिल्हा बँकेच्या शाखा कार्यान्वित आहेत. अशा 16 गावांशी निगडीत 78 खेडी व 25 आदिवासी पाडे यांना विविध प्रकारच्या बँकींग सुविधा जिल्हा बँक प्रदान करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांचा शेती मालाची विक्री होत असून शेतकऱ्यांना माल विक्रीपोटी व्यापाऱ्यांकडून धनादेश दिले जात आहेत. तरी शेतकरी सभासदांनी कृषी उत्पन्न बाजार समितीस माल विक्रीपोटी मिळालेले धनादेश अथवा आदिवासी भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी आदिवासी विकास योजनेंतर्गत धान्य अथवा इतर शेतीमाल विक्रीपोटी मिळालेले धनादेश आपल्या बँकेच्या स्थानिक शाखेत आपल्या खात्यावर जमा करावेत.
एकरकमी परतफेड सवलत योजनेचा लाभ घ्या
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व आदिवासी विविध कार्रकारी सोसायटीकडून चालू पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले पिक कर्जाचा भरणा जवळच्या जिल्हा बँकेच्या शाखेत करून शून्य टक्के व्याजाचा फायदा घ्यावा; तसेच बँकेच्या जुन्रा थकबाकीदार सभासदांसाठी एकरकमी परतफेड सवलत योजना बँकेने राबविली असून, या योजनेचा थकबाकीदार कर्जदार सभासदांनी एकरकमी परतफेड करून या संधीचा लाभ घ्यावा.
– राजवर्धन कदमबांडे, अध्रक्ष, जिल्हा सहकारी बँक, धुळे