चिकसे : साक्री तालुक्यातील दातर्ती येथे सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. परतीच्या पावसात खराब झाल्यानंतर उरलेला चांगला कांदा शेतातून काढण्याच्या कामासह सध्या शेतकरी वर्ग बाजरी, सोयाबीन, मका या पिकांच्या मळणीत गुंतला आहे.
शेतातून कांदा काढून साक्री, पिंपळनेर, धुळेसह उमराणो, नामपूर, पिंपळगांव (ब) तसेच सुरत मार्केटला पाठवला जात आहे. शेतकरी संजय खैरनार, दिलीप बागुल, दगडू सोनवणो यांनी सांगितले की कांद्याचे अपेक्षित उत्पन्नही निघाले नाही व मार्केटला पुरेसा दरही मिळत नाही. सध्या सहाशे ते हजार रूपयांपर्यंत कांद्याला दर मिळत असल्याचे वरिल शेतकऱ्यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांकडे विहीरीचे पाणी उपलब्ध आहे त्यांनी बागायती पिके गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी पेरणीची कामे आटोपली आहेत. उन्हाळी कांदा लागवड, भाजीपाला लागवड व काही पिकांची निंदणी अशी कामेही सध्या दातर्ती शिवारात सुरू आहेत. दातर्ती गावातून ऊस तोडणीसाठी मजूरवर्ग मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याने शेतीकामे करताना मजूर टंचाई जाणवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.