पिंपरी :- बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना ४२५ व्या जयंती दिनी प्रदेशसचिव सुरेशदादा गायकवाड व पुणे जिल्हा प्रभारी अशोकदादा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
अभिवादन प्रसंगी शहराध्यक्ष सुशिल गवळी, जिल्हा उपाध्यक्ष धम्मदिप लगाडे, प्रविण वाकोडे, शहर सचिव विकी पासोटे, शहर सचिव विकास सुर्यवंशी, शहर प्रभारी बाळासाहेब गायकवाड, बलराज कटके, बन्सी रोकडे, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष राहुल शिंदे, बापुसाहेब गायकवाड, प्रकाश ज्ञानदेव गायकवाड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.