हैदराबाद – भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा १०वा फलंदाज ठरला आहे. शुबमन गिलने 149 चेंडूचा सामना करताना आपल्या खेळीत 19 चौकार आणि 9 षटकार लगावले. त्याचबरोबर तो भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.
गिलने विराट आणि धवनला मागे टाकत 1000 धावा केल्या पूर्ण
शुभमन गिलने या डावात 106 धावा करताच वनडे क्रिकेटमध्ये 1000 हजार धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलने 19 वनडे सामन्यांच्या 19 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम विराट कोहली आणि शिखर धवनच्या नावावर होता. विराटने 27 सामन्यांच्या 24 डावात तर धवनने 24 सामन्यांच्या 24 डावात हा विक्रम केला.