पिंपरी– चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. ही निवडणूक २७ फेब्रुवारीला होणार होती. ती आता २६ फेब्रुवारीला होणार आहे. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा हा निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे या निवडणुकीची तारीख बदलावी, असे अहवालात नमूद केले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.