साक्री : तालुक्यातील सामोडे परिसरातील शेतऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिसरातील शेतऱ्यांना कांद्याचे उत्पन्न बऱ्यापैकी आले असले तरी बाजारात काद्यांला भाव हवा तसा भाव न मिळाल्याने शेतऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजार पेठेत कांद्याला भाव न मिळाल्याने शेतऱ्यांनी मालाची विक्री न करता चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र तरीदेखील कांद्याला भाव मिळेल या आशेवर शेतऱ्यांनी कांदा लावणीवर भर दिला आहे. अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे कांदा शेतातच फेकावा लागला होता तर कांद्यांसाठी लावलेले भांडवलदेखील निघू शकले नाही. शासनाने कांद्याला भाव द्यावा, अशी मागणी शेतऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सामोडे परिसरातील काही शेतऱ्यांनी ऊस लावणीवर भर दिलेला आहे. मका, बाजारी, सोयाबीन आदी भुसार धान्यातून शेतऱ्यांना एकरकमी पैसा मिळत नसल्याने या पिकाकडे शेतऱ्यांनी पाठफिरविली आहे. तर ऊस, कांदा यातून एक रकमी पैसा मिळतो म्हणून शेतकरीवर्ग जास्त भर देतांना. यावर्षी रोजंदारी वाढल्याणे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. यावर्षी शेतऱ्यांना 200 ते 250 रुपये रोजंदारी द्यावी लागत आहे.
मजूरी देऊन देखील मजूर मिळत नसल्याने शेतऱ्यांना भटंकती करावी लागत आहे. सामोडे परिसरात पाणी मुबलक असल्यामुळे शेतऱ्यांनी हिवाळी पिकांना लक्ष दिले आहे.
काही शेतऱ्यांकडे बैलजोडी नसल्यासमुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे आटोपली जात आहे. मात्र ट्रॅक्टरचालक मनमानी भाव घेतांना दिसत शेतऱ्यांना नांगर व रोटर करण्यासाठी 3 हजार ते साडेतीन हजार रूपये द्यावे लागत आहे.