धुळे : जानेवारी ते मे 2017 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात साक्री तालुक्यातील प्रतापपूर, रोहोण, झंजाळे या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस दि. 16 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द त्याच दिवशी करण्यात येईल. आवश्यक असल्यास मतदान दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेण्यात येईल.