धुळे : अनुसुचित जाती, नवबौध्द घटकांच्या बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती व्ही. बी. हिंगे यांनी दिली आहे.
समाजकल्याण विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 19 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सदर योजनेचे 2016-17 या आर्थिक वर्षासाठी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे उपलब्ध आहे. संबंधित बचत गटांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती हिंगे यांनी केले आहे.