कासारे : साक्री तालुक्यातील कासारे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 250 रुग्णांची या वेळी नेत्रतपासणी करण्यात आली.
धनंजय आनंदराव भामरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धनंजय भामरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपसरपंच संजय वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख, माजी उपसरपंच राजेंद्र सोनवणे, माजी सरपंच सुभाष देसले, प्रा. बी. एम. भामरे, शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एन. एस. साळुंखे, मुख्याध्यापक के. डी. सोनवणे, मनोहर भामरे, सं. नि. मुख्या. दत्तात्रेय बागुल, प्रा. डी. आर. खैरनार, सुहास सोनवणे, एस. आर. बीरासीस, रविंद्र देवरे, एन. के. दशपुते, मोहन देसले आदी उपस्थित होते.
नंदूरबार येथील कांता लक्ष्मी शहा नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. गजानन माने, साक्री येथील श्री समर्थ डेंटल क्लिनीकचे दंतरोग तज्ज्ञ डॉ. राहुल खैरनार यांनी 150 रूग्णांची दंत रोग तपासणी केली, गरजुंना औषधे, ड्रॉप मोफत देण्यात आली. 60 रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नंदूरबार येथील कांतालक्ष्मी शहा नेत्रालय येथे पाठविण्यात आले. जाण्यायेणार्यांची सोय, चहा, नाश्ता, जेवण, औषधे, काळा चष्मा, लेन्स टाकून शस्त्रक्रिया सर्व सुविधा मोफत करण्यात आली. सुरेश पारख या वेळी म्हणाले की, बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक, साक्री तालुका प्रवासी महासंघ, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, शिक्षक संघटना, मराठा सेवा संघ, प्रेस क्लब, पत्रकार, साक्री तालुका शिक्षक पतपेढी अशा विविध संघटनांचे पदाधिकारी म्हणून धनंजय आनंदराव भामरे यांनी कार्य केले आहे. धनंजय भामरे किर्ती रूपाने अमर झाले. 26 जानेवारी 2012 रोजी कासारे येथील धनदाई पतसंस्थेतर्फे धनंजय भामरे यांना मरणोत्तर समाज भुषण पुरस्कार देण्यात आला.
शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बी. एस. देसले, विलास देसले, पी. झेड. कुवर, जे. एम. वाघ, रोहन भामरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. विलास देसले यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख, अंनिसचे कार्याध्यक्ष विलास देसले, मातोश्री चंदनबाई पारख महिला बचत गटाच्या अध्यक्ष मंगला पारख, मनोहर भामरे व भामरे परिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.