कोल्हापूर : राज्यात आज निवडणूक झाली तरी शिवसेना एकट्यानं 150 जागा जिंकेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गडहिंग्लज येथे आयोजित जाहीरसभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना-भाजप सरकारचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका केली. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. तत्त्पूर्वी संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले. त्यांनी ‘आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. 2024 साली सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘मोदींचे मित्र म्हणून अदानींना नोटीस मिळत नाही. पण आमच्या आमदारांना आणि मला नोटीस मिळते. आज पंतप्रधान मोदींनाही उद्धव ठाकरे हे आव्हान वाटत आहेत. त्यामुळेच शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र रचलं गेलंय. पण सच्चा शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा आहे आणि हीच खरी आमची ताकद आहे. आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. 2024 मध्ये सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप सरकारचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका केली. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. हा विधिमंडळाचा अपमान असल्याचं सांगत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.