पुणे– संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. पोटनिवडणुकीसाठी (26 रविवारी, फेबुवारी) मतदान झाले. रासने यांच्याविरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे उमेदवार आहेत. त्यामुळं य़ेथे कॉंटे की टक्कर होणार आहे. याचा निकाल 2 मार्चला, उद्या लागणार आहे. पण त्यापूर्वीच एक्झिटपोलचा अंदाज समोर आले असून, कसब्यातून भाजपाला धक्का बसणार असून, चिंचवडमध्ये जगताप यांचा विजय नक्की मानला जात आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.
दरम्यान, कसब्यातून मविआचे रवींद्र धनगेकर हे उमेदवार आहेत, पण धनगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच परवा (27 फेब्रवारी) रोजी विजयाचे तसेच अभिनंदन…करणारे पोस्टर लागले होते. त्यानंतर आता चिंचवडमध्ये देखील निकालाआधीच अश्विनी जगताप यांचे विजयाचे अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळं दोन्ही ठिकाणी निकालाआधीच विजयी झाल्यामुळं अभिनंदन असे पोस्टर लावल्यामुळं आश्चर्य व्य़क्त करण्यात येतंय.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी उद्या निकाल लागणार आहे, पण दोन्ही ठिकाणी कोण जिंकणार यावर चर्चा होत असून, वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असून, आता एक्झिटपोलचा निष्कर्ष देखील समोर आला आहे. कसब्यात भाजपचा पराभव होणार असल्याचं एक्झिटपोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असल्याचंही एक्झिटपोलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. शिंदे गट आणि मनसेची साथ असतानाही आणि राज्यात सत्ता असतानाही कसब्याचा कौल भाजपच्या विरोधात जात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातोय, मात्र येथे भाजपाचा पराभव होईल असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलंय, तसेच आता स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिटपोलनुसार कसब्यातून भाजपाला धक्का बसेल अंस म्हटलंय. तर चिंचवडमध्ये जगताप यांचा विजय होईल, असं म्हटलंय. त्यामुळं उद्या काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कशी आहे मतांची टक्केवारी?
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे 50.06 टक्के आणि 50.47 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. येत्या गुरुवारी 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. कसब्यात सन 2019 च्या निवडणुकीत 51.54 टक्के, तर चिंचवडमध्ये 55.88 टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणूक असल्याने मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडणार नाहीत ही भीती खरी ठरली. कसब्यात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दीड टक्के मतदान कमी झाले. नुकत्याच विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफूटवर यावं लागल्याने, त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतले बारकावे आणि इथल्या मतदारांमधील कल तसेच दिग्गजांची घेतलेल्या सभा यामुळं मोठ्या प्रमाणात मतदान होईल असं बोललं जात होतं. पण फिफ्टी- फिफ्टी असं चित्र काल दिसून आलं.