हेमंत रासनेंना 61771 मिळाली मते
पुणे- संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल (Result) लागला आहे. अखेर निकाल हाती आला आहे, मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत, असं निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आहे. कसब्यात रवींद्र धंगेरकरांचा 11 हजार 040 मतांनी विजयी मिळाली आहेत, तर हेमंत रासनेंना 61771 मिळाली मते मिळाली आहेत, त्यामुळं या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तिथे आता मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. धंगेकर यांनी एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत, तर हेमंत रासने यांना ६१७७१ एकूण मते मिळाली आहेत.
तर पाचव्या फेरीत कसब्यात पाचव्या फेरीत रवींद्र धनगेकरांना 4131 मते, तर हेमंत रासनेंना 2639 मते; नोटाला 86 मते तर आनंद दवेंना 100 मते मिळाली आहेत. दरम्यान, ताज्या माहितीनुसार कसब्यात सहाव्या फेरीतपर्यंत रवींद्र धनगेकरांना एकूण 23080 मते, तर हेमंत रासनेंना एकूण 20363 मते मिळाली आहेत, नोटाला 86 मते तर आनंद दवेंना 100 मते मिळाली आहेत. १२ फेरीनंतर ५ हजार २०० मतांनी धंगेकर आघाडीवर आहेत. दरम्यान, ताज्या माहितीनुसार कसब्यात आता १८व्या फेरील धंगेरकरांना 9 हजार 204 मतांची आघाडी आहे, धंगेकरांना 64358 मते तर हेमंत रासनेंना 55987 मते मिळाली आहेत.
भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. खासकरुन कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, त्यामुळं येथे भाजप गड राखणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आणि कसबा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धनगेकर पहिल्या फेरीत 5 हजार मतांनी पुढे आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तर भाजपाचे हेमंत रासने यांना 2800 मतं मिळाली होती, त्यानंतर आता कसब्यात तिसऱ्या फेरीत रवींद्र धनगेकर 677 मतांनी पुढे आहेत, तर रासने पिछाडीवर पडले आहेत, नोटाला 86 मते तर आनंद दवेंना 42 मते पडली आहेत.