महाविकास आघाडीचे काटे, बंडखोर कलाटे पराभूत
चिंचवड :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप या तब्बल ३६,०९१ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख ३५ हजार ४३४ एवढी मते पडली. या निवडणुकीत एकूण ३७ फेऱ्या झाल्या.
भाजपच्या अश्विनी जगताप यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली होती. शेवटच्या ३७ व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांची ३६ हजार ९१ मतांची आघाडी राहिली असून १ लाख ३५ हजार ४३४ एवढी मते त्यांना मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ९९,३४३ मते तर अपक्ष राहुल कलाटे यांना ४४,०८२ एवढी मते मिळाली आहेत.