पिंपरी :- शिवजयंती निमित्त मधुकर बच्चे युवा मंच व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मशीनींद्वारे सर्वांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे चिंचवड येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने या शिबीराचे नियोजन करण्यात आले होते.
गणेश कांबळे, डॉ. वैभव आवताडे, डॉ. कांचन घोष, अंजली सावंत, शिवानी शिंदे, सभा सालेहा, श्रेया तळदेवकर, आदींनी शिबीरात नागरिकांच्या तपासण्या केल्या व नागरिकांना अत्यंत उत्कृष्ट सेवा दिली. शिबिरात १०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी रोहिणी बच्चे, प्राध्यापिका माधुरी गुरव, सुषमा कोरे, सिमरन मौलवी, पोपट बच्चे, मच्छिंद्र थोरवे, गणेश बच्चे, गिरीश हंपे, अर्चना बच्चे, राजेश्री जाधव आदींनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांची अत्यंत उत्तम व दर्जेदार तपासण्या करून सेवा दिल्याबद्दल मधुकर बच्चे यांच्या वतीने ईशा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.