पिंपरी :- चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. कासारवाडीतील रुपाली विकास लांडे यांच्यावतीने ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेवक किरण मोटे, माऊली थोरात, माजी प्रभाग सदस्य कुणाल लांडगे, पीसीएमटीचे माजी सदस्य बाळासाहेब लांडे, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, सीमाताई कोल्हापुरकर, स्नेहल धराडे तसेच कासारवाडीतील जेष्ठ नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.
लक्ष्मणभाऊंनी रुग्णांसाठी मोलाचे कार्य केले. रुग्णांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे, असे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.