गुप्ता आणि जयस्वाल ऑल इंडिया फाऊंडेशन, श्री हनुमान मित्र मंडळाचा पुढाकार
पिंपरी :- गुप्ता आणि जयस्वाल ऑल इंडिया फाऊंडेशन, श्री हनुमान मित्र मंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त संभाजीनगर येथील शिवाजी पार्कमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार (दि. ६) रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सकाळी ५ वाजता काकडा आरती, सकाळी ८.३० वा. श्री हनुमान पूजन आणि संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान जय श्री राम भजनी मंडळाचे सुंदरकांड (हनुमान चरित्र भजन) तर, रात्री आठ वाजता महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विजय गुप्ता, मुन्ना डी. गुप्ता, भावेश धर्मनाथ प्रसाद गुप्ता, मनोज गुप्ता, विनोद शामसुंदर गुप्ता यांनी केले आहे.