नवीन पाठ्यपुस्तकं नव्या शैक्षणिक धोरणासह आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वापरासाठी उपलब्ध होतील, असं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. एनसीईआरटी बोर्डाच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे आता एनसीईआरटी बोर्डच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे.
नवीन पाठ्यपुस्तकं नव्या शैक्षणिक धोरणासह आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वापरासाठी उपलब्ध होतील, असंही शिक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितलं की, कोरोनामुळे डिजिटल लर्निंगची गरज निर्माण झाली. नवीन पाठ्यपुस्तके डिजिटली उपलब्ध करुन दिली जातील. जेणेकरून कुणालाही ती डाऊनलोड करता येतील.