पिंपरी :- माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “खेळ महोत्सव २०२३” चे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या वाढदिवसानिमित्त कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत पिंपळे सौदागर परिसरात “खेळ महोत्सव २०२३” चे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. या “खेळ महोत्सव २०२३” चे उद्घाटन भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभा आमदार अश्विनीताई जगताप, विधान परिषद आमदार उमाताई खापरे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
पिंपळे सौदागर परिसरातील विविध ठिकाणी विविध खेळाचे आयोजन करून शत्रुघ्न काटे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. या खेळ महोत्सवात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी “नगरसेवक चषक पर्व २” या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पिंपळे सौदागर, रहाटणी परीसरातील साधारण ११० सोसायटी संघाने तसेच खुल्या गटातील साधारण ५० संघाने सहभाग नोंदवला.
या “खेळ महोत्सव २०२३” मध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील साधारण ७५० मुलांनी सहभाग घेतला. पावसाची रिमझिम सुरु असताना देखील या चिमुकल्यांनी हताश न हॊता जिद्दीने या स्पर्धेत सहभाग घेत सर्वांचीच मने जिंकली. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पिंपळे सौदागर येथिल शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी “ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप” चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध गटातील साधारण ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पिंपळे सौदागरला एक स्पोर्ट हब बनविण्याचा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे स्वप्न या “खेळ महोत्सव २०२३” च्या माध्यमातून पूर्णत्वाच्या दिशेने अग्रेसर होत आहे.