नागपूर जिल्ह्यातील एका कारखान्याला सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. सोनेगाव निपाणी ग्रामपंचायत एमआयडीसी परिसरातील कटारिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी ट्विट केले की, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.