ग्रीड सोलार प्रकल्पाचे तसेच रहिवाशांसाठी उभारलेल्या ई-चार्जिंग स्टेशनचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते रविवारी (दि.२३) लोकार्पण झाले. वाकड येथील वाकड सेंटर सोसायटीने पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकली आहेत. सोसायटीने उभारलेल्या ऑन ग्रीड सोलार प्रकल्पातून वीज निर्मिती होत आहे. या प्रकल्पाद्वारे महिन्याला ३५ ते ४० हजारांची तर वर्षाकाठी तब्बल साडे चार लाखाहून अधिक रकमेची घसघशीत विज बचत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागला आहे.
यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, प्रदेश सदस्या भारती विनोदे, बाळासाहेब आल्हाट, सोसायटीचे चेअरमन शीर्षानंद पांडा, सचिव बिनय रॉय, सुरज भुजबळ यांच्यासह सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहारातील इतर सोसायट्यांनी वाकड सेंटर सोसायटीचा आदर्श घेत समाज व पर्यावरण हित जपावे अशा शब्दात आमदार जगताप यांनी कौतुक केले.
२५.७ किलो व्हट क्षमता असलेल्या या प्रकल्पाद्वारे १४५० वार्षिक युनिट निर्माण होतील याचाच अर्थ वर्षाला तब्बल साडे चार लाखांची तर प्रत्येक महिन्याला ३५ ते ४० हजरांची विज बचत होणार आहे. सोसायटीने उत्पादित केलेल्या या विजेवर जिना, पार्किंग, गार्डन, स्ट्रीट लाईट, टेरेस,क्लब हाऊस या ठिकाणची सार्वजनिक दिवे तसेच लिफ्ट, पाण्याचे पंप, बोअरवेल इत्यादींना मोफत वीज मिळत आहे. सोसायटीने साकारलेले ईव्ही चार्जिंग स्टेशनही याच विजेवर चालणार असून दोन, तीन व चार चाकी वाहने चार्ज करता येणार आहेत.
सोसायटीतील राहिवाशांत पर्यावरण संवर्धन, संगोपन याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने शाश्वतता, पर्यावरण आणि हवामान बदल या विषयावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत
प्रथम:- संतोष धोटे
द्वितीय:- यज्ञ चौधरी
तृतीय:- सोनाली पोलाजवार
चतुर्थ:- नायनिका चॅटर्जी
उत्तेजनार्थ:- तनय रॉय
या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व पारितोषिक देवून गौरविण्यात आले. राम वाकडकर यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.