दिल्ली : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. १५० वैद्यकीय महाविद्यालयं निगराणीखाली ठेवली आहेत. चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, देशात ६५४ वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील आहेत. या महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला.
महाविद्यालयं विहित नियमांचं पालन करत नाहीत आणि आयोगानं केलेल्या तपासणीत सीसीटीव्ही कॅमेरे, आधार-लिंक्ड बायमेट्रिक हजेरी प्रक्रिया आणि फॅकल्टी रोलशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलत महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे.






















