चौफेर न्यूज – विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व कळावे या दृष्टिकोनातून शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील सर यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी मतदान करावे. ही संधी उपलब्ध करून दिली. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक 15 -7-2023 रोजी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना ब्ल्यू हाऊस कॅप्टन कुमारी.जानवी दाभाडे कुमार. प्रसाद सोनवणे रेड हाऊस कॅप्टन कुमारी.उत्कर्षा अहिरे कुमार. पुनीत बोरसे ग्रीन हाऊस कॅप्टन कुमारी.मेघना चव्हाण कुमार. संस्कार शिंदे हाऊस येलो हाऊस कॅप्टन कुमारी.खुशी पंजाबी कुमार.कार्तिक देवरे यांना बहुमताने निवडून दिले या चारही हाऊस मधील प्रतिनिधींनी हाऊस मास्टर यांच्या मार्गदर्शना द्वारे ब्ल्यू हाऊस मास्टर श्री गणेश नांद्रे सौ पुनम पवार रेड हाऊस मास्टर सौ मनीषा बोरसे मॅम ग्रीन हाउस मास्टर श्री तुषार सूर्यवंशी सर हेमांगी गवांदे मॅम येलो हाऊस मास्टर श्री.श्रावण अहिरे सर सौ. सपना देवरे मॅम यांच्या मार्गदर्शनाद्वारे आठ दिवस शालेय परिसरामध्ये प्रत्येक वर्गात जाऊन आपल्यासाठी मतदान करून आपले अमूल्य मत देऊन योग्य तो प्रतिनिधी निवडावा असे सांगितले. प्रत्येक हाऊस कॅप्टनने मी शालेय विकासासाठी प्रयत्न करेल. शालेय आवारात स्वच्छता, वर्ग नियंत्रण ठेवेल. शाळेच्या प्राचार्या व व्यवस्थापक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निरसन करण्यास प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. वर्षभरात शाळेमध्ये होणारे विविध उपक्रम,खेळ, स्पर्धा यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना देखील सहभागी होऊन शालेय प्रगतीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मतदान करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या मतदान प्रक्रियेत शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील सर शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम,उपप्राचार्य मालविका मॅम, व्यवस्थापक श्री. तुषार देवरे सर श्री. वैभव सोनवणे सर अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग संयोजन श्री कुणाल देवरे सरांनी केले.