चौफेर न्यूज –
दरवर्षीप्रमाणे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये हेडबॉय हेडगर्ल निवडणूक घेण्यात येते त्याच प्रमाणे दिनांक 15/07/2023 वार शनिवार रोजी हेडबॉय हेडगर्ल साठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत 4 मुली व 4 मुले असे एकूण 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातून स्कूलच्या हेडबॉय व हेडगर्ल साठी ब्ल्यू हाऊस मधून प्रसाद सोनवणे 331 मतांनी हेडबॉय म्हणून त्याचा दणदणीत विजय झाला.तसेच येलो हाऊस मधून हेडगर्ल म्हणून खुशी पंजाबी हि 263 मतांनी विजयी झाली.
त्यांच्या सत्कार शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅडम व शाळेचे कॉर्डिनेटर श्री.वैभव सोनवणे सर व श्री. तुषार देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता नेरकर मॅडम यांनी केले व विजयी उमेदवारांना सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोषात त्यांचे अभिनंदन केले.