चौफेर न्यूज – 23 जुलै 2023 रोजी स्कूलमध्ये लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम,उपप्राचार्य सौ. मालविका मॅम,व्यवस्थापक श्री. तुषार देवरे सर,श्री.वैभव सोनवणे सौ हेमांगी बोरसे मॅम यांच्या हस्ते सरस्वती माता व लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता आठवीतील ओम अहिर राव व प्रितेश कुवर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन करत असताना लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी परिचय करून दिला.”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच “अशी सिंह गर्जना देणारे लोकमान्य टिळक हे एक वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता,भारतीय क्रांतिकारी, भारतीय स्वतंत्रता सेनानी होते असे सांगितले.याप्रसंगी इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अरबी पवार युकेजी,अनुश्री नेरकर युकेजी ,गितेश राजपूत आठवी,भार्गवी ठाकरे सातवी, हर्ष सोनवणे आठवी,समीक्षा चव्हाण सातवी,रुचिका खैरनार सातवी, मृणाल बेडसे नववी,चैतन्या देसले चौथी,स्वरा देवरे पाचवी,अनुष्का कुंदे पाचवी,वेदिका नांद्रे पाचवी तनिष्का सोनवणे लोकमान्य टिळकांबद्दल माहिती देताना सांगितले की बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. त्यांना अन्यायाबद्दल चीड होती. त्यांची बंडखोर होती आणि कणखर बाणा हा लहानपणापासूनच दिसत होता. टिळक पुणे येथील एका खाजगी शाळेत गणित व इंग्रजीचे शिक्षक झाले. टिळकांवर पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. जनतेमध्ये एकता निर्माण व्हावी. यासाठी टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती या मराठी उत्सवांची स्थापना केली.व इंग्रजांचा विरोध दर्शवण्यासाठी 1908 मध्ये सहा वर्षाचा कारावास त्यांना भोगावा लागला होता.याप्रसंगी शाळेचे शिक्षक रवींद्र सोनवणे सर यांनी ठिकाण विषयी माहिती देताना सांगितले की टिळक एक क्रांतिकारी अधिकारी होते ज्यांना वाचनाचा छंद होता. टिळकांनी 24 ऑक्टोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 मध्ये या सोसायटीने माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूल व उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले असे सांगितले.या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. हेमांगी बोरसे मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.