चौफेर न्यूज – 22 जुलै 2023 रोजी स्कूलमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना खातेवाटप व शपथविधी साठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी परेड करून प्रत्येक हाऊस लीडर यांना मंचावर आमंत्रित केले. यासाठी मार्गदर्शन तुषार देवरे सरांनी केले.सौ.सपना देवरे मॅम यांनी सूत्रसंचालन करत असताना प्रथम हेड बॉय ब्ल्यू हाऊस कॅप्टन कुमार प्रसाद सोनवणे( प्रेसिडेंट )व हेड गर्ल येलो हाऊस कॅप्टन कुमारी खुशी पंजाबी ( व्हॉइस प्रेसिडेंट) तसेच ब्ल्यू हाऊस लीडर कुमारी जानवी दाभाडे ( सेक्रेटरी ) कुमार दुर्गेश खैरनार (हेल्थ हायजिन कोऑर्डिनेटर ) रेड हाऊस लीडर कुमारी उत्कर्षा अहिरे( लँग्वेज फोरम कोऑर्डिनेटर) कुमार पुनीत बोरसे (एन्व्हायरमेंटल कोऑर्डिनेटर ) येलो हाऊस लीडर रोशनी ठाकरे (डिसिप्लिन कोऑर्डिनेटर) ब्ल्यू हाऊस लीडर कार्तिक देवरे (ॲथलेटिक कोऑर्डिनेटर ) ग्रीन हाऊस लीडर कुमारी मेघना चव्हाण को (करिक्युलर कोऑर्डिनेटर ) कुमार संस्कार शिंदे (सोशल कोऑर्डिनेटर ) या सर्व विद्यार्थ्यांना खाते वाटप करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे संस्थापक श्री.प्रशांत भीमराव पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम,उप प्राचार्या सौ. मालविका मॅम,श्री.तुषार देवरे, सर श्री.वैभव सोनवणे सर सौ.हेमांगी बोरसे यांच्या हस्ते प्रत्येक हाऊस नुसार पदवी बहाल करण्यात आली. व सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे पदानुसार आपापल्या मिळालेल्या पदांची कामगिरी बजवावी.याविषयी सौ.सपना देवरे मॅम मार्गदर्शन केले. विद्यार्थी आपापल्या पदानुसार आपली कामगिरी बजावतील याची ग्वाही त्यांनी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे यांना दिली. विद्यार्थ्यांचा शपथविधी सौ. मालविका मॅम यांच्या मार्गदर्शनाद्वारे सुसंपन्न झाला. या कार्यक्रमाचे संयोजन श्री.कुणाल देवरे सरांनी केले.याप्रसंगी सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.