चौफेर न्यूज – आज दि 22/07/2023 रोजी प्रचिती स्कूल पिंपळनेर येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि ते मी मिळवणारच ” असा मोहरा कधी न झाला कधी न होणार. बाळ गंगाधर टिळक हे नाव जगात गर्जत राहणार…. गर्जत राहणार. आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तसेच लोकमान्य टिळकांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाची माहिती किरण मॅडमांनी दिली. लोकमान्य टिळकांविषयी काजल मॅडमांनी भाषण दिले. कार्यक्रमात अनेक विदयार्थ्यांनी लोकमान्य टिळकांविषयी माहिती व भाषणे दिली. आजच्या कार्यक्रमानिमित्त लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधरित निबंध स्पर्धा घेण्यात घेण्यात आली. त्यानंतर शाळेतील विदयार्थ्यां समवेत वृक्षारोपण करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमासाठी कार्तिक कोठावदे, व अंशु कदम टिळकांच्या वेशभूषेत हजर होते. आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन व रांगोळी साकारण्यात आली होती.
कार्यक्रमाची सांगता सुनिता जाधव मॅडमांनी आभार प्रदर्शनानी केली. आजच्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






















