चौफेर न्यूज ः प्रचिती प्रि प्रायमरी स्कूल , साक्री येथील ब्ल्यू डे साजरा करण्यात आला . निळा हा प्राथमिक रंग आहे. तो सागर आणि आकाशाचा रंग आहे; हा रंग सहसा शांतता, स्थिरता, प्रेरणा, शहाणपण किंवा आरोग्य यांचे प्रतीक आहे. तो एक शांत रंग असून विश्वासार्हतेचे प्रतीक आहे शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील सर यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे मॅडम , मालविका मॅम व्यवस्थापक वैभव सोनवणे सर आणि तुषार देवरे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इयत्ता नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन निळ्या रंगाच्या वस्तू घरून तयार करून आणल्या होत्या जसे की निळ्या रंगाचे मासे, फुगे ,पक्षी, फुलं इत्यादी. कार्यक्रमाच्या वेळेला विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या कार्डशिट पेपर वर विद्यार्थ्यांना वेगवेगळे आकाराच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करून घेतल्या. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कल्पेश अहिरे याने हिंदी कविता सादर केली तसेच कार्यक्रमाची माहिती शाळेच्या शिक्षिका हिरन सोनवणे मॅडम यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी पुनम मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून अतिशय सुंदर अशी कविता म्हणून घेतली. कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर असे फलक लेखन शिक्षिका कांचन साळुंखे, वैष्णवी थोरात, दीपमाला अहिराव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन श्वेता मॅडम यांनी केले.. या कार्यक्रमाच्या इनचार्ज शाळेच्या शिक्षिका सविता लाडे मॅडम या होत्या. अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला…