चौफेर न्यूज ः प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे आज दिनांक 28/7/2023 रोजी ग्रीन डे सेलिब्रेशन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रण करो, उन मंजिलो के कांटे हम हटेंगे
अपने Enviroment Day पर उनमें नए फुल हम लगाऐंगे
हो सकेगा तो खुद को इतना मजबुत हम बनाऐंगे कि पहले की तरह ही Nature में जीना फिर से हम अपनाऐंगे
या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजनाने झाली. त्याचप्रमाणे प्रि प्रायमरीच्या शिक्षिका व विद्यार्थी हिरव्या कलरच्या वेशभुषेत उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यार्थांना हिरव्या रंगाविषयी हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या याविषयी विद्यार्थांना अधिक माहिती देण्यात आली.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक रेखाटण्यात आली. सुंदर अशी रंगोळी रेखाटण्यात आली. सुनिता जाधव मॅम यांनी ग्रीन डे विषयी माहिती दिली. रिनल सोनवणे मॅम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली. विद्यार्थांचे शिक्षण हे एका बंद खोलीत नसुन निसर्गाच्या सानिध्यात घ्यायला हवे हे विचार विद्यार्थांच्या मनात रूजविले.
विद्यार्थांनी छान असे कपडे परिधान केले. त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या वस्तु बनवून आणल्या. हिरव्या रंगाचा क्राऊन परिधान केलेला होता. त्याचप्रकारे सर्व विद्यार्थांनी हिरव्या रंगाची छत्री, हिरवी भेंडी, वांगी, शिमला मिरची, हिरवा बेडूक, हिरव्या रंगाच्या गीतावर सुंदर असे नृत्य केले.
अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता किरण मॅम यांनी केले.