प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
साक्री- : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज मधील 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा संकुल येथे स्केटिंग स्पर्धा पार पडली. यामध्ये, चावरा स्कूल (धुळे ), हस्ती इंग्लिश मीडियम स्कूल (नंदुरबार ) व प्रचिती इंटरनॅशनल स्कूल (कावठे) आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्केटिंग स्पर्धेत कुशल राहुल पाटील- प्रथम क्रमांक ( नववी ), 14 वर्ष वयोगट स्केटिंग स्पर्धेत अजिस शाम साळुंखे (आठवी )-प्रथम क्रमांक, सोहम शाह (आठवी)- द्वितीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या 14 वयोगट स्केटिंग स्पर्धेमध्ये भार्गवी उदय ठाकरे (सातवी) – प्रथम क्रमांक गोल्ड मेडल मिळविले.
11 वयोगट स्केटिंग स्पर्धेत पुष्कराज विपिन पवार( तिसरी)- गोल्ड मेडल ,शिव प्रशांत बेडसे (तिसरी)- गोल्ड मेडल , प्रथम मिलिंद सोनवणे (तिसरी ) – सिल्वर मेडल ,कार्तिक धनंजय सोनवणे (तिसरी)- ब्रांझ मेडल पटकविले.
या विद्यार्थ्यांना शुभम सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन मिळाले. या विजयाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, शिक्षक- वर्ग व कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.