जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड
धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार पावसाळी क्रीडा स्पर्धा
साक्री- : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी निजामपूर येथील आदर्श विद्यालयामध्ये झालेल्या पावसाळी तालुकास्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निजामपुर येथे नुकत्याच पार पडलेल्या योगा स्पर्धेत आमा पाटील पिंपळनेर, एकलव्य विद्यालय पिंपळनेर, डी.जे. अग्रवाल पिंपळनेर, आदर्श विद्या मंदिर निजामपूर, छत्रपती विद्यालय पिंपळनेर व प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, कावठे आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सदर योग स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या 17 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये यथार्थ सतीश पाटील- प्रथम क्रमांक ( नववी ), मधुर योगेश शेवाळे – द्वितीय क्रमांक ( नववी ), ध्रुवम पंकज देवरे – चौथा क्रमांक (नववी), दिव्यम प्रशांत पाटील -पाचवा क्रमांक (नववी).
तसेच, मुलींच्या 17 वयोगट योगा स्पर्धेमध्ये भाग्यश्री सुरेश चोरडिया- प्रथम क्रमांक (दहावी), समता राजेंद्र कांकरिया- द्वितीय क्रमांक (दहावी) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे यांच्यासह शिक्षक वर्ग व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.