साक्री : प्रचिती प्रि प्रायमरी स्कूल साक्री येथे अनोख्या पद्धतीने “ग्रीन डे” साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ध्वज तिरंग्यामधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग – प्रगती, भरभराट, समृद्धी, सुसंवाद, स्थिरता, संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे, त्यामुळे पृथ्वीचे सौंदर्य हिरवेगार ठेवून, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विद्यार्थी जीवनापासून वृक्षारोपण, संवर्धनासाठी पुढाकार घ्या, असे मत शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी व्यक्त केले. “ग्रीन डे” निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, मालविका मॅडम, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इयत्ता नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन हिरव्या रंगाच्या वस्तू तयार केल्या. यामध्ये, हिरव्या रंगाचे झाडे, फुगे, पोपट, फळे, नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचा ताज तयार केले. तसेच कार्यक्रमाची माहिती शाळेच्या शिक्षिका देवका चव्हाण यांनी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी अश्विनी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांकडून अतिशय सुंदर अशी कविता म्हणून घेतली.
कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर असे फलक लेखन शिक्षिका सुनिता पाटील, श्वेता सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता गोसावी यांनी केले. या कार्यक्रमाच्या संयोजक शाळेच्या शिक्षिका कांचन मॅडम होत्या. अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला