पिंपरी – रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.
नाना काटे यांनी पोस्ट ॲाफीस व महापालिका विभागा यांना दिलेल्या पत्रात असे नमुद केले की, प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागत ८० हजार ते १ लाख व त्यापेक्षा जास्त लेकसंख्या आहे, या परिसरात खासगी, व सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच संरक्षण विभागाचे कार्यालय, निवास्थान, सरकारी व खासगी बॅकाचे व आयटी पार्कचे कार्यालय आहेत. परिसरातील नागरिकांना पोस्ट ॲाफीस बाबत कामे करण्यासाठी,औधं किंवा पिंपरी, चिचवड च्या पोस्ट ॲाफीस मध्ये जावे लागत असल्याने नागरिकांना याचा त्रास व मोठी गैरसोय होत असल्याचे पोस्ट ॲाफीस विभाग व मनपा विभाग यांच्या निदर्शनास आणुन दिले होते, त्यासाठी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन पोस्ट सुरू व्हावे यासाठी २०१२ पासून पत्रव्यवहार देखील नाना काटे व शितल काटे यांनी वेळोवेळी पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांच्याकडे केला होता व सातत्याने प्रयत्न देखील करीत होते, त्यांना नवीन पोस्ट ऑफिससाठी लागणारी महापालिकेची पर्यायी जागा देखील सुचविली होती त्याची पाहणी देखील मनपा व पोस्ट विभागाच्या अधिकारी वर्सोगाबत केली होती. त्याचेच यशप्राप्त म्हणुन त्यास अनुसरून पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांनी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन सुरू करण्याच्या प्रशासकीय कामास सुरूवात करण्यात आली आहे तसे पत्राद्वारे देखील त्यांनी कळविले आहे. त्यामुळे रहाटणी पिपंळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरु होणार असल्याने नागरिकाची पोस्ट ॲाफीसची वणवण आता संपणार आहे..