पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे हिंदी दिन साजरा करण्यात आला. हिंदी दिनानिमित्त शाळेत हिंदी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.सुनीता जाधव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी, शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून हिंदी दिनाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता मॅडम यांनी हिंदी दिनाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. किरण मॅडम यांनी हिंदी दिवसाची माहिती दिली. हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. तसेच, विद्यार्थ्यांनी हिंदीचे महत्त्व मांडणा-या कथा सांगितल्या. भारतात दरवर्षी १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. हिंदी भाषा ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आभार मंगला बहिरम यांनी मानले.