साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तुषार सूर्यवंशी, रविना सूर्यवंशी यांच्या हस्ते गणेश मूर्तीची यथाविधी पूजा करून स्थापना करण्यात आली. याप्रसंगी, गणपती रायास दुर्वांची माळ, लाल फुले, फळे व मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच, गणपतीची आरती करून धूप नैवेद्य दाखवून सर्वांनी मोदक प्रसादाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमासाठी अष्टविनायक गणपतीचे सुंदर रेखांकन जितेंद्र राजपूत, कांचन साळुंखे यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन सविता मॅडम, देविका मॅडम यांनी केले. सुंदर अशा चांद्रयान -3, आकाशगंगाच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. यासाठी वैष्णवी थोरात, वैष्णवी देवरे, तेजस्विनी घरटे यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, यासह सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी, वाहन चालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी उत्कृष्ट सजावट करावी, यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच, विद्यार्थ्यांचा सहभाग वाळविण्यासाठी दररोज प्रत्येक वर्गाची आरती व नैवेद्याचे नियोजन श्रावण अहिरे, मनीषा बोरसे, गणेश नांद्रे, प्रफुल्ल साळुंके यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन वैशाली खैरनार, भूपेंद्र साळुंखे यांनी केले.