पिंपरी : कॅशलेस व्यवहारासाठी सरकारने आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील तालकतोरा मैदान येथे डिजिधन मेळ्यात ‘भीम’ हे मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पेमेंट करणारे तसेच लकी ग्राहक योजनेचे विजेते यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजि धन मेळ्यात युवकांना संबोधित करताना डिजिटल पेमेंट करणार्‍या ग्राहकांचे आभार मानले. भीम या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्यांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. डिजिटल हे देशाच्या प्रगतीचे साधन आहे, असे सांगतानाच या योजनेला विरोध करणाऱ्यांना त्यांनी चिमटे काढले.  डिजिटल माध्यमातून सर्वसामान्यांची प्रगती आहे, असेही त्यांनी सांगितले. गरिबांचे धन गिळणा-यांनाच बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here