प्रचिती इंटरनॅशनल स्कूल,साक्री येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे आज दि.29 रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अजय सोनवणे ( लोकनियुक्त सरपंच – भाडणे ), विकास देसले, संजय भामरे, प्रमोद पाटील, धनंजय घरटे, महेश मराठे, अनिल बागुल, मोरे सर, राकेश साळुंखे, राजेंद्र पगारे, अविनाश टिळे, विजय पवार, क्रीडा स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक धनंजय सोनवणे, अनिल पाटील, अमोल अहिरे, अर्जुन राऊत, राकेश मोरे, दगडू ठाकरे, राजकुमार देवरे, अशोक सोनवणे, शैला देवरे (क्रीडा शिक्षक पेरेजपूर ), प्रतिभा पोपटराव पाटील (क्रीडा शिक्षिका आश्रम शाळा, इंदवे ), प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या वैशाली लाडे तसेच शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, क्रीडाशिक्षक कुणाल देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी, क्रीडा खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व प्रादेशिक शाळा , ग्रामीण व शहरी शाळेतील विद्यार्थी क्रीडापटूंनी रिले, शॉट पुट , थाळी फेक , १०० मीटर धावणे, भालाफेक, लांब उडी इत्यादी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी क्रीडापटूंनी सहभाग घेतला. सर्व क्रीडापटूंनी त्यांच्या खेळातून क्रीडा कौशल्य दाखवून आपल्या क्षमतेनुसार क्रमवारी प्राप्त केली. या सर्व यशस्वी खेळाडूंना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मंजुळाताई गावित यांनी जीवनात यश कसे मिळवावे याचे मार्गदर्शन केले.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी शारीरिक क्षमता ही बळकट असावी आणि ती खेळाच्या माध्यमातून घडविली जाते, असे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे तर प्रास्ताविक स्मिता नेरकर यांनी केले. कार्यक्रमाची सजावट वैशाली खैरनार, छायाचित्रण व्हिडिओ शूटिंग वैष्णवी थोरात यांनी केले.